भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन,महिलांच्या समस्या आणि उपाय
जगभरात भारताची ओळख पंथनिरपेक्ष,धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आणि मानवता जपणारा देश म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे भारताने जगाला दिलेला " वसुधैव कुटुम्बकम् " च्या संदेशातून सर्वांना सामावून घेण्याची व आपलेपणाने वागण्याची वृत्ती दिसून येते.कदाचित ही वृत्ती भारतात असणाऱ्या जातीय,धार्मिक, वांशिक, भाषिक विविधतेतून आलेली असावी. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण 77 व्या वर्षात पदार्पण करत आहोत. पण तरीही भारतासारख्या लोकशाही आणि मानवतावादी मूल्य जपणाऱ्या देशासमोर आज काही सामाजिक , राजकीय ,आर्थिक घटकात स्त्रियांचा विकास साधण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रस्तुत लेखात आपण स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यां आणि त्यांच्या उपायोजना यावर चर्चा करणार आहोत. समस्या :- १) स्त्रियांच्या शैक्षणिक समस्या:- भारतीय संस्कृतीत स्त्रीला शिकवणे म्हणजे काही अनर्थ ओढवेल किंवा घराचा सर्वनाश होईल. अशी भीती भारतीय समाजात पाहायला मिळते. यातूनच कदाचित स्त्रिशिक्षणाला दुय्यम दर्जा प्राप्त झाला असेल. या सर्वांचा दूरगामी परिणाम म्हणून सध्या भारताच्या एकूण लोक